अंबरनाथ दि. २५/प्रतिनिधी :- जनादेशाचा अपमानकरून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली असुन आघाडी सरकारच्या बेफीकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आज सकाळी अंबरनाथ तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी युती करून निवडणुकीनंतर भाजपाचा विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करत असताना शिवसनच्या पक्षप्रमुखाना आणि आताच्या मुख्यमंत्री यांनी तसेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन अवकाळग्रस्ताना २५ हजार रूपये हेक्टरी आणि फळबागासाठी ५० हजार रूपये हेक्टरी मदत शिवसेनन शतकव्यांचा देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अश्या घोषणा करणा-या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळले नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकट फसवणुक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्पमुदतीची पिककर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्ज माफीचा फायदा मिळणार नाही. लाखांवर कर्ज असलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत माफी योजनेत कोणताच उल्लेख नसल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी यावेळी केला.