सुदर्शन खेडेकर ने पटकावला 'ठाणे श्री' चा किताब, तर उपविजेता ठरला कल्याणचा हबीब सय्यद

अंबरनाथ दि. ३/प्रतिनिधी :- अंबरनाथ शहरातील कै. रमेश भगवान गोसावी हे उत्कृष्ट व्यायाम पटू होते. त्यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत 'ठाणे श्री' हा किताब मिळवला होता. गोसावी यांच्यावरती व शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या नागरिकांनी लाखो रुपयांच्या दिलेल्या लोकवर्गणीच्या जोरावरती अंबरनाथमध्ये ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोशिएशनच्या मान्यतेने 'कै. रमेश गोसावी स्मृती-ठाणे श्री ( शरीरसौटत जो आयोजना पशिमेकडील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अब्दुलभाई शेख व नगरसेवक सुनील सोनी यांनी केले होते. या स्पर्धेत 'कि फिटनेस अंबरनाथ'चा सुदर्शन खेडेकर याने 'ठाणे श्री'चा किताब मिळवत प्रथम मानकरी ठरला, तर अल्फा जिमचा हबीब सय्यद हा उपविजेता ठरला.


या शरीरसौष्ठव स्पर्धेत १३१ पुरुषांनी, तर ९ महिलांनी सहभाग घेतला होता. यात म पुरुषांच्या संघातून ५५ किलो गटातून संदीप तरणे, ६० किलो गटातून नईम खान, ६५ किलो गटातून पियुष धुरी, ७० किलो गटातून विजय जाधव, ७५ किलो गटातून सुदर्शन खेडेकर, ८० किलो गटातून सुमित पगारे राहुल क्षेत्रे, ८५ किलो गटातून हबीब सय्यद हे विजेते ठरले, तर महिलांमधून मयुरी पोटे व अंजली पिल्ले हे विजेते ठरले. कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारेआमदार डॉ. बालाजी किणीकरमाजी नगराध्यक्ष सुनील चौधरीमाजी उपनगराध्यक्ष जयसिंग पाटील, उपशहरप्रमुख परशुराम पाटील, अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, नगरसेवक किरणकुमार कांगणे, उमेश गुंजाळ, माजी नगरसेवक रवींद्र करंजुले, भाजपा पश्चिम अध्यक्ष राजेश कौठाळेअमेश गौडा, विकास सोमेश्वरराहुल सोमेश्वर, दिलीप पतंगेशिवसैनिक सुभाष भोळे, चंद्रकांत खेडगिकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व अंबरनाथ शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोशिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र चव्हाण, कैलास भोईरदिलीप माने व ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सर्व पंच आणि जज यांनी अथक परिश्रम केले. तसेच यंदा ‘कै. रमेश गोसावी स्मृती-ठाणे श्री शरीरसौष्ठव स्पर्धा-२०२०' या स्पर्धेकरिता अंबरनाथ नगरपरिषदेने निधी उपलब्ध करून न दिल्याने सदर कार्यक्रम हा लाखो रुपयांची लोकवर्गणी जमा करून केलेला आहे. परंतु, येणाऱ्या वेळेस कै. रमेश गोसावी यांच्या नावाने नगरपालिकेच्या माध्यमातून 'महाराष्ट्र श्री' हि शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अब्दुलभाई शेख यांनी सांगितले.