उन्हाळा सुरु होतोय. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा बसायला सुरुवातही झाली असेलच. हा तोच काळ आहे, ज्यात पाण्याची गरज अधिक लागते आणि याच काळात पाणी जास्त वाचवावंही लागतं म्हणून चला, आजपासून नवीन सुरुवात करु या, तहान लागली तर छोट्या ग्लासने पाणी पिऊ या म्हणजे पाणी कमी HR पडल तर परत पाणी घेऊ शकतो पण, तहान कमी असेल तर मोठ्या ग्लासमध्ये उरलेले पाणी फेकून देण्याची वेळ येणार नाही. कारण पाणी ही गोष्ट अशी आहे जी वाचवली तरच उद्या मिळणार कुणीतरी म्हटलंच आहे की, वाणी आणि पाणी जपून वापरा कारण, वाणीमुळे तुमचा वर्तमानकाळ आणि पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे. चला तर मग...
वाणी आणि पाणी जपन वापरा..